काय सांगता...गावच्या उपसरपंचाकडून पोलिसाला मारहाण

काय सांगता...गावच्या उपसरपंचाकडून पोलिसाला मारहाण


काय सांगता...गावच्या उपसरपंचाकडून पोलिसाला मारहाण
माणदेश एक्सप्रेस न्युज 
खरसुंडी/वार्ताहर : चक्क गावच्या उपसरपंचाकडून पोलिसाला मारहाण झाल्याचा प्रकार चिंचाळे येथे घडला असून याबाबत उपसरपंचावर आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस कॉन्स्टेबल सचिन बाळू लोंढे कोरोना पार्श्वभूमीवर गस्त घालत होते त्यावेळी रस्त्यावर पाईपलाईनचे काम करण्यासाठी दहा पंधरा लोक एकत्र झाले होते. पोलीस कॉन्स्टेबल लोंढे यांनी सदरची गर्दी का जमली आहे याची चौकशी करण्यासाठी थांबले. त्यावेळी उपसरपंच सुरेंद्र गायकवाड त्यांच्याकडे चौकशी वेळी मास्क का घातला नाही अशी विचारणा केली? त्यावेळी उपसरपंच सुरेंद्र गायकवाड यांना खरसुंडी औटपोष्ट येथे मोटर सायकल घेऊन येत असताना त्याने मोटरसायकल  वरून थोरात वस्ती येथे नेली व पोलीसाला उद्धट वर्तन करून शिवीगाळ करून मारहाण केली, पोलिसांना फार मस्ती आली आहे, गावात परत दिसलात तर सरळ पाठविणार नाही असा दम दिला.त्यामुळे पोलिसांनी उपसरपंच गायकवाड यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यास पकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर भादविस कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, १८८, २६९, २७०, २७१ व २००५ चे कलम ५१ महाराष्ट्र कोविड १९ उपाय योजना २०२० कलम ११ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून सदरची घटना चिंचाळे येथील थोरातवस्ती येथे सकाळी ११.०० वाजता घडली असून पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पाटील करीत आहेत. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments