Type Here to Get Search Results !

अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा पुढाकार : डॉ. रमेश होसकोटी


अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा पुढाकार : डॉ. रमेश होसकोटी
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता शालेय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यासमाला हा उपक्रम संपूर्ण राज्यभर सुरू झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी ऑनलाइन अभ्यासमाला सुरू आहे. त्यामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिकणे सुरू असल्याची माहिती डायटचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी दिली.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम !
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा !




डायट अधिव्याख्याता विषय सहाय्यक, समावेशिततज्ज्ञ, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती यांच्या माध्यमातून प्रत्येक  पालकांचे व्हाट्सअप ग्रुप, शिक्षकांचे विविध व्हाट्सअप ग्रुप यांच्या माध्यमातून ही अभ्यासमाला दररोज पोहोचविण्यात येते. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आवडीचा झाला असून याबाबत पालकांनी सकारात्मक प्रतिसाद व समाधान व्यक्त केले आहे.
लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेत जरी येऊ शकत नसले तरीही ते SCEERT , पुणे मार्फत तयार करण्यात आलेल्या दीक्षा ॲप ऑनलाईन अभ्यासमाला व पूर्व प्राथमिक/बाल शिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दररोज सकाळी १०.००  वाजता  'गली गली सिम सिम'  हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. या माध्यमातून शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी होत आहेत. दैनंदिन झूम मीटिंग च्या माध्यमातून देखील शिक्षण विभाग व डायट मधील सर्व अधिकारी, विषय सहाय्यक, शिक्षक, सर्व स्वतः गुणवत्ता विकासात सक्रिय राहून कार्य करीत आहेत. तसेच विद्यार्थी, पालक सर्व शिक्षकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.  सांगली जिल्ह्यातील सर्व अधिकारी, शिक्षक ,पालक व विद्यार्थी सजगतेने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करून Study From Home हा उपक्रम यशस्वीपणे चालू ठेवले आहेत. त्याबद्दल डायटचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies