मुंबईच्या वांद्रे पश्चिम बस डेपोजवळ मोठी गर्दी ; पोलिसांच्या आवाहनानंतर गर्दी ओसरली


मुंबईच्या वांद्रे पश्चिम बस डेपोजवळ मोठी गर्दी ; पोलिसांच्या आवाहनानंतर गर्दी ओसरली
मुंबई : मुंबईच्या वांद्रे पश्चिम बस डेपोजवळ मोठी गर्दी जमा झाल्याने प्रशासनावरती मोठा ताण निर्माण झाला. परराज्यातील कामगारांनी मूळगावी जाण्यासाठी आग्रह धरला असल्याने व लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ ओढावल्याचे सांगत मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर आला. आपल्या मूळ गावी जाण्याची मागणी त्यांनी केली.  पोलिसांनी याठिकाणी मोठा बंदोबस्त लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली त्यानंतर या मजुरांमध्ये आक्रोश निर्माण झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सरकारने हे पाऊल उचललं असलं तरी मोलमजुरी करून जगणाऱ्या कामगारांचे प्रचंड हाल झाले आहेत. या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही कोरोनापेक्षा उपासमारीने मरू अशा प्रतिक्रिया मजुरांनी दिली.


 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured