दिघंचीत नारळाच्या झाडावर वीज पडल्याने घेतला पेट


दिघंचीत नारळाच्या झाडावर वीज पडल्याने घेतला पेट
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : दिघंची ता. आटपाडी. जि. सांगली येथे नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळाने अचानक पेट घेतला.
आज सायंकाळी ६ ते १० च्या सुमारास आटपाडी शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडात पाऊस झाला. तालुक्यात खरसुंडी येथे गारांचा पाऊस पडला. तर दिघंची येथे असणाऱ्या हॉटेल तुषार जवळील नारळाच्या झाडावरती वीज पडल्याने नारळाने अचानक पेट घेतल्याने लोकांची धावपळ उडाली. यावेळी नागरिकांनी सतर्कता दाखवत आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured