Type Here to Get Search Results !

कोरोना संकटात वसुंधरा संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद : ॲड वैभव पाटील ; वसुंधरा संस्थेतर्फे विटा नगरपरिषद कर्मचाऱ्यांना मास्क वाटप


कोरोना संकटात वसुंधरा संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद : ॲड वैभव पाटील ; वसुंधरा संस्थेतर्फे विटा नगरपरिषद कर्मचाऱ्यांना मास्क वाटप
माणदेश एक्स्प्रेस न्युज
विटा :  कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर विटा शहर सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणारे, विटा नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना वसुंधरा पर्यावरण संस्था खानापूर यांचेवतीने कापडी मास्क देण्यात आले. 
विटा शहरात नगरपरिषद कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. कोरोना विषाणू माहिती व मदत कक्ष माध्यमातून नगराध्यक्षा प्रतिभा पाटील व मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली कामकाज करत आहेत. सर्व सफाई कर्मचारी शहर स्वच्छतेत मोलाचे योगदान देत आहेत या सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वसुंधरा पर्यावरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने सर्वांना मास्क देण्यात आले.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम!
*तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा ! आभार गीत




दत्तात्रय शिंदे, नानासाहेब मंडलिक, प्रा.डॉ.बाळासाहेब कर्पे, नितीन चंदनशिवे, गणेश धेंडे, भगवान जाधव, असलम शेख यांचेसह इतर पदाधिकारी या उपक्रम यशस्वी करण्यासाठी तळमळीने झटत आहेत. कोरोना संकटावर मात करण्यासाठी आपण चेहऱ्यावर मास्क वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच हा संसर्ग रोखण्यास मदत होईल. नागरिकांनी शसनाच्या सुचनांचे पालन करुन काळजी घ्यावी. एक सामाजिक बांधिलकी म्हणून वसुंधरा संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद आहे अशा शब्दात माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील धन्यवाद व्यक्त केले.  यावेळी संस्थेचे सचिव नितीन चंदनशिवे, असलम शेख, केदार जावीर, विजयकुमार ठिगळे, रोहीत पवार, कोमल हसबे, स्नेहा पवार आदी उपस्थित होते.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies