Type Here to Get Search Results !

डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा कोलकत्ता येथून सांगोला तालुक्यातील नागरिकांशी फोनवरून मनमोकळा संवाद


डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा कोलकत्ता येथून सांगोला तालुक्यातील नागरिकांशी फोनवरून मनमोकळा संवाद
माणदेश एक्सप्रेस न्युज
कोळा/जगदीश कुलकर्णी : कोलकत्ता येथील रवींद्रनाथ टागोर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियाक  हॉस्पिटलमध्ये कोरोनोच्या विभागामध्ये सांगोला तालुक्याचे मा आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख काम करत आपली सेवा बजावत आहेत. अशा परिस्थितीत सांगोला तालुक्यातील नागरिकांशी  कार्यकर्त्यांशी फोनवरून मनमोकळा संवाद साधत काळजी घ्या, सध्या परिस्थिती अवघड आहे, आपलं आरोग्य महत्वाचा आहे, घरचे सगळे बरे आहेत का, गोरगरिबांना मदत करा, आरोग्य संदर्भात काही अडचण असेल तर फोन करा, कोरोनोच्या पार्श्वभूमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करत असून तुमचं ऐकायला आम्ही आहोत असा संदेश जनतेला डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोरोनो बाबत विचारले असता डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, संपूर्ण जगात कोरोना चा हैदोस सुरू आहे. भारतातही कोरोनाचे पेशंट थोड्या प्रमाणात का होईना वाढत आहेत. महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे विशेषत: मुंबई-पुणे सोलापूर येथील धोका वाढलेला असून कोरोनो वर प्रतिबंधात्मक इलाज हाच, उपचारापेक्षा ही श्रेष्ठ आहे, हे वाक्य कोरोना या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी तंतोतं लागू पडत आहे. जगात, देशात, राज्यामध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने सुरू झाला असून, माझ्या बंधू आणि भगिनींनी घरात थांबून स्वतःच्या कुटूंबाची काळजी घेतली घ्यावी. तुम्ही घरात थांबल्या मुळे तुम्ही इतरांच्या कुटूंबाची काळजी तुमच्या कडून घेतली जाईल. अशामुळे कोरोना संक्रमणाचा वेग मंदावेल. कोरोना रोगाचे संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी सांगोला आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, परिचर, पोलीस प्रशासन, सफाई कामगार रात्रंदिवस स्वतःच्या जीवाची परवा न करता मेहनत घेत आहेत.


हे ही वाचा :- माणदेशातील ज्येष्ठ साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन


लॉक डाऊन च्या काळात माझ्या बंधू आणि भगिनींनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. कामा निमित्त काही बाहेर पडावे लागले तर मास्कचा वापर करावा, कामा निमित्त घरातून बाहेर पडताना फुल बाह्यचा शर्ट व फुल पॅन्ट घालूनच बाहेर पडावे. या संक्रमनाच्या काळात २० सेकंदा पेक्षा जास्त कालावधीसाठी वारंवार हात धुवावेत. घरी आल्यानंतर गरम पाण्यात कपडे धुवून व गरम पाण्याने अंघोळ करूनच घरात प्रवेश करावा. कोरोनो मुळे सध्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम दैनंदिन जगण्यात होत असतो एक स्वभाविक भीती दडपण आहे अशावेळी मनात नकारात्मक विचार येतात त्याचा वेळीच निचरा झाला नाही तर गंभीर परिणाम माणसाच्या मानसिक स्वातावर होण शक्य असतं. आम्ही डॉक्टर समुपदेशक असल्याने निराशेने ग्रासलेल्या व्यक्तीशी बोलून त्याचं मन हलकं करण फोन करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत असे डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले.


सांगोल्याच्या ग्रामीण भागात सर्व सामान्य जनतेला अनेक प्रश्न असून अनुभवत असत्तात त्यात मानसिक स्वास्थ महत्त्वाच आहे याची जाणीव पदोपदी होते, त्यातूनच फोन करणे उपक्रमाची कल्पना सुचली.
डॉ. बाबासाहेब देशमुख
कोरोनो विभाग कलकत्ता


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies