हाकेवाडीत गोपीचंद पडळकर आमदार झाल्याने गुढी उभारून स्वागत

हाकेवाडीत गोपीचंद पडळकर आमदार झाल्याने गुढी उभारून स्वागत


हाकेवाडीत गोपीचंद पडळकर आमदार झाल्याने गुढी उभारून स्वागत
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे :  महाराष्ट्रातील युवकांचे हृदयसम्राट व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांची विधान परिषदेवर बिनविरोध आमदार म्हणून निवड झाल्याने आनंदाचे प्रतिक म्हणून आटपाडी तालुक्यातील हाकेवाडी येथे गुढी उभारण्यात आली.
सध्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉककडाऊन सुरु आहे. त्यामुळे संचारबंदी व जमावबंदी चे उल्लंघन न करता हाकेवाडी येथे विजयी गुढी उभा करून प्रा. प्रभाकर हाके, सुभाष हाके, अनिल हाके, ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब मेटकरी, नानासाहेब हाके, गणेश हाके, दिनेश हाके, बापूसाहेब हाके, बंडोपंत हाके, तानाजी हाके, विशाल मेटकरी, सुनिल डोईफोडे, रविंद्र हाके, राहुल हाके, शशिकांत हाके, दिनेश सरगम, बाळू सरगर, श्रीधन पुजारी यांनी आनंद व्यक्त केला.
अतिशय सामान्य परिस्थितीत, गरीब कुटुंबातील, व्यक्ती सलग पंधरा वर्ष बहुजन समाज, शेतकरी, कष्टकरी, विविध सामाजिक आरक्षण, अनेक आंदोलनांमध्ये पुष्कळ वेळा तुरुंगवास भोगून, परखड व धारदार वक्ता, तेवढाच प्रेमळ स्वभाव, गोरगरीब जनतेबद्दल आस्था असणारा नेता अशी ओळख गोपीचंद पडळकर यांची आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानणारा विशिष्ट असा वर्ग आहे.त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरीच राहूनच गोपीचंद पडळकर यांच्या विजयाची गुढी उभा करावी असे आवाहन सुभाष हाके यांनी यावेळी केले.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस


 


Post a comment

0 Comments