सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीने शिवणे येथील 71 कुटुबांना दिला मदतीचा हात

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीने शिवणे येथील 71 कुटुबांना दिला मदतीचा हात


सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीने शिवणे येथील 71 कुटुबांना दिला मदतीचा हात
माणदेश एक्सप्रेस न्युज
महूद/वैभव काटे : सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला गरिबाच्या मदतीला धावून आली आहे. शिवणे येथील 71 गरीब कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे सर्व कामे ठप्प आहेत. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील मजूर, कष्टकरी, कामगार, गवंडी, शेतमजुर यांना बसला आहे.
ग्रामीण भागातील सर्वच कामे बंद असल्याने कामगारांच्या हाताला काम नाही. काम नसल्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे अवघड झाले आहे. ही गोष्ट सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांना धान्य कीटच्या  स्वरूपात गरजवंताना मदत दिली. सदर मदत चंद्रकांत (दादा) देशमुख संचालक सोलापुर जिल्हा मध्य.सहकारी बँक यांचे हस्ते वाटप करण्यात आली. यावेळी बबन (भाऊ) जानकर माजी जि.प.सदस्य, संजय (नाना) इंगोले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, सौ.मनिषा कांबळे सरपंच, एन.बी.जोशी ग्रामसेवक, विजय लोखंडे तलाठी, दत्तात्रय पाटील पोलीस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments