याठिकाणी ३२५ जणांनी केले विक्रमी  रक्तदान 

याठिकाणी ३२५ जणांनी केले विक्रमी  रक्तदान 


याठिकाणी ३२५ जणांनी केले विक्रमी  रक्तदान 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील श्री सिद्धिविनायक को ऑप क्रेडिट सोसायटी आणि दत्तात्रय पाटील युवामंचच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात विक्रमी ३२५ जणांनी रक्तदान केले. अनिलशेठ पाटील आणि दत्तात्रय पाटील यांच्या पुढाकाराने संयोजित या शिबिरास युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने आटपाडीत प्रथमच विक्रमी रक्तदान झाले. आयकर आयुक्त सचिन मोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, अनिलशेठ पाटील, दत्तात्रय पाटील, दादासाहेब पाटील, विनायक मासाळ, डॉ.उमाकांत कदम, धनंजय गिड्डे, संग्राम नवले, सौरभ नवले, सर्जेराव पुजारी, अक्षय अर्जुन यांच्या उपस्थितीत शिबिराचे संपन्न उदघाटन झाले. श्री कल्लेश्वर मंदिराच्या सभागृहात सोशल डिस्टन्स राखत सदरचे रक्तदान शिबीर संपन्न झाले. सांगोला येथील रेवनील ब्लड बँकेमार्फत रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदात्यांना आयोजकांच्या वतीने हेल्मेट, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


 


Join Free Telegram माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments