Type Here to Get Search Results !

विरळीत कोरोनाग्रस्त सापडल्याने म्हसवडसह अनेक गावात पाच दिवसाचा जनता कर्फ्यू


विरळीत कोरोनाग्रस्त सापडल्याने म्हसवडसह अनेक गावात पाच दिवसाचा जनता कर्फ्यू
माणदेश एक्स्प्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : अहमदाबाद येथून माण तालुक्यातील विरळी येथे एकाच वाहनातून सलग १५ तासांचा प्रवास करुन आलेल्या खानापुर तालुक्यातील साळशिंगे येथील महिला व विरळी येथीलही २५ वर्षीय एक तरुणाचा कोरोनाचा तपासणीचा अहवाल  पॉझिटिव्ह आल्याने म्हसवडसह परिसरातील गावात पाच दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विरळी ता माण येथील एक कुटुंब व्यवसायानिमित्त अहमदाबाद येथे राहात असून, त्यांच्या बरोबर पत्नी, दोन मुले व दोन कामगार होते. गुजरात राज्यातही कोरोना साथीचे संकट आल्यामुळे प्रत्येक जण गावाकडे येऊ लागले आहेत. अहमदाबाद मध्ये असलेले सातारा, सांगली भागातील विरळी, भिलवडी, साळशिंगे या गावचे असलेले एकूण १७ जण एका मिनी बसने तीन मे रोजी अहमदाबाद वरून ८२८ कि.मी.चा प्रवास करून गावी आले होते. 
याच मिनीबसमध्ये सांगली जिल्ह्यातील खानापुर तालुक्यातील साळशिंग येथील एक महिला सोबत आलेली होती. ती चार महिण्याची गरोदर होती. ती गावात चेकअप करण्यासाठी गेली असता सदर महिलेला होत असलेल्या त्रासाच्या लक्षणावरून तेथील डॉक्टरांनी त्यांना कोरोना टेस्ट करण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर त्या महिलेचा पॉझिटिव्ह रिपोर्ट निघाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. 
त्यानंतर या मिनी बस मधील माण तालुक्यातील विरळी येथील गावात उतरल्या सहा सहा जणांस येथीलच जानुबाई विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. तालुका वैदकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर व म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे व पोलिस पाटील रायचंद गोरड, सरपंच प्रशांत गोरड यांनी तातडीने विरळी येथील सहा जणांना क्वारंटाईन केले असता त्यामधील २५ वर्षीय तरुणास त्रास जाणऊ लागल्यामुळे त्या सर्वांचे स्वॅबचे नमुने पुढील तपासणी साठी पुणे येथे पाठविण्यात आले असता काल रात्री उशीरा त्या २५ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे माण तालुक्यातील शासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणा जलद गतीने कार्यरत झाली. गावाला माण-खटावचे प्रांताधिकारी, तहसिलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांनी पोलिस फौजफाट्यासह भेट दिली.
विरळी गावात जनता कर्फ्यु लागू करण्यात आल्याची माहिती पोलिस पाटील रायचंद गोरड यांनी दिली असून, संपुर्ण गाव घरात लॉकडाऊन झाले आहे. तर विरळी खोऱ्या वळई, वडजल, शेनवडी, काळचौडी, कुकुडवाडसह इतर गावातही लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी ग्रामस्थांनी स्वयंफूर्तीने केली असुन खबरदारीची उपाययोजना म्हणून हि संबंधित सर्व गावे म्हसवड शहरातील बाजारपेठेशी निगडीत असल्यामुळे म्हसवड येथील नागरिकांनी दि. १३ पासून सलग पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. 
म्हसवड येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असून म्हसवड परिसरातील गावास जोडले गेलेले सर्व रस्ते बंद असून ग्रामस्थांनी म्हसवड शहरात येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies