आटपाडीत उन्हाच्या झळा अधिक तीव्र ; पारा ४० अंश सेल्सियवर


आटपाडीत उन्हाच्या झळा अधिक तीव्र ; पारा ४० अंश सेल्सियवर
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी सह तालुक्याला उन्हाच्या झळा लागल्या बसू  लागल्या असून पारा ४० अंश सेल्सियवर पोहचला असून अंगातुन घामाच्या धारा वाहत असल्यातरी कोरोना या संसर्गजन्य विषाणुजन्य थंड पेया पासून दुर राहण्याचा डॉक्टरांचा सल्ला असल्याने घामाच्या धारा सध्यातरी पुसण्याशिवाय नागरिकांपुढे पर्याय नाही. 
मे महिना सुरु होवून ५ दिवस झाले असून तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. सकाळी ८ पासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. सध्या कमाल तापमान ३९ ते ४१  अंश सेल्सियवर पोहोचले आहे. दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण आणि कडक उन्हाने दाहकता जाणवू लागली आहे.
लॉकडाऊन असल्याने नागरिक घरात थांबून आहेत. परिणामी घरातील पंखे पंख्यांचा वापर वाढला अआहे. कारण एसी बंद ठेवण्याचे सरकारने सांगितले आहे. थंड पाण्यासाठी  माठातील पाण्याचा वापर वाढला आहे. शरीराला थंडावा मिळण्यासाठी लिंबू सरबतचे मोठ्या प्रमाणात केले जात असून बाजारात १० रुपयांना  ५ लिंबे मिळत आहेत. तर कोकम सरबत, रसना यासारखे तयार सरबत ही मिळत असून त्याचा पिण्यासाठी वापर केला जात आहे. आटपाडी तालुका का कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो. त्यातच उन्हाची भर पडल्याने सर्वसामान्य शेतकरी वर्गही त्रस्त आहेत. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी शेतीच्या कामात खंड पडत आहे.  तापमान या महिन्यात वाढतच जाणार आहे. 
 Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad