...तर दारूची दुकाने बंद करू ; खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा 

...तर दारूची दुकाने बंद करू ; खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा 


...तर दारूची दुकाने बंद करू ; खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : रेड झोनमधल्या मद्यविक्रीला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या मागणीला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. औरंगाबाद हे सध्या रेड झोनमध्ये असल्याने येथे दारूविक्री बंदच राहावी, अशी मागणी जलील यांनी केली आहे. तसेच, जर दारुविक्री सुरु केली, तर लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरू, असा इशाराच जलील यांनी सरकारला दिला आहे. रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं सुरू आहेत. मात्र आता त्या व्यतिरिक्त इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांनादेखील परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये मद्यविक्री करणाऱ्या दुकानांचा समावेश होतो. मात्र अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं सुरू असताना काही नियम पाळावे लागणार आहेत. एका लेनमधील केवळ पाचच दुकानं सुरू राहू शकणार आहेत. त्यामुळे जर दारूची दुकाने उघडली तर ती सक्तीने बंद करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे खासदार जलील हे सरकारच्या या निर्णयाविरुद्ध आक्रमक झालेले दिसत आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments