वैद्यकीय साधनसामग्री खरेदीसाठी यांनी दिला पंचवीस हजारांचा धनादेश


वैद्यकीय साधनसामग्री खरेदीसाठी यांनी दिला पंचवीस हजारांचा धनादेश
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : अकलूज येथील युवा उद्योजक सुजयसिंह माने-पाटील आणि माने पाटील परिवाराकडून माळशिरस तालुक्यात वैद्यकीय साधनसामग्री खरेदीसाठी 25 हजार रुपयांचा धनादेश नुकताच सुजयसिंह माने-पाटील यांनी माळशिरसच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे नायब तहसीलदार तुषार देशमुख यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी प्रगतशील शेतकरी हरी पालवे उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधात्मक लढाईसाठी माळशिरस तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीतील सर्वच अधिकारी, पदाधिकारी, वैद्यकीय सेवक, पोलीस प्रशासन, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आदी सर्वच जण दिवस-रात्र परिश्रम घेताना दिसून येत आहेत. परंतु हे काम करीत असताना पीपीई किट, मास्क, सॅनीटायझर, व्हेंटिलेटर आदी वैद्यकीय उपकरणांची भविष्यात तालुक्यात कमतरता भासू नये यासाठी हा धनादेश आपत्ती व्यवस्थापन समितीला वैद्यकीय साधनसामग्री घेण्यासाठी देण्यात आला आहे असे सुजय माने-पाटील म्हणाले. याच बरोबर माने-पाटील कुटुंबीयांच्या वतीने येत्या चार दिवसात अकलूज आणि परिसरामध्ये जवळपास तीनशे कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य देण्यात येणार असल्याची माहिती ही माने-पाटील यांनी दिली.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad