Type Here to Get Search Results !

 सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्याने काही प्रमाणात सुट, तरी सोशल डिस्टसिंग पाळणे अनिवार्यच : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्याने काही प्रमाणात सुट, तरी सोशल डिस्टसिंग पाळणे अनिवार्यच : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या झोनमध्ये सांगली जिल्हा ऑरेंज झोन मध्ये आल्याने काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. सोशल डिस्टंसिंग पाळणे, आनावश्यक गर्दी न करणे, मास्क वापरणे या अटी शर्तीना अधिन राहून देण्यात शिथिलता आले आहे. आता पर्यंत जी आपण शिस्त पाळली आहे त्यामुळे जिल्हा रेड झोन मधून ऑरेंज झोनमध्ये आला आहे. जर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर पुन्हा आपला झोन बदलून पुन्हा रेड झोन मध्ये जाऊ शकतो.  त्यामुळे ज्या सवलती आपल्या मिळाल्या आहेत त्या बंद होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. ज्या सवलती मिळाल्या आहेत त्या शासनाने दिलेल्या निर्देशानूसार वापर करणे आवश्यक आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. 
राज्यात लॉकडाऊनचा कालावधी १७ मे २०२० पर्यंत वाढविणे तसेच या काळात करावयाच्या उपायांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांसंदर्भात राज्य शासनामार्फत आदेश जारी करण्यात आला. रेड (हॉटस्पॉट),ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील धोक्यांची तीव्रता लक्षात घेऊन या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. काही भागांमध्ये कामांसाठी परवानगी देण्यात आली असली तरी त्यांना कोविड १९ प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठीचे नियम मात्र काटेकोरपणे पाळावे लागतील. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज मध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 


कंटेंमेंट झोन असलेल्या परिसरात सद्यस्थितीत चालू असलेल्या नियमावलीत कोणताही बदल होणार नाही. अत्यावश्यक, जिवनावश्यक वस्तुंच्या विक्री व वैद्यकीय अस्थापना या शिवाय या परिसरामध्ये काहीही उघडे राहणार नाही. कंटेन्मेंट झोनमधील १००  टक्के नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे अनिवार्य. आत आणि बाहेर जाण्याचे मार्ग निश्चित केलेले राहतील. सहवासितांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग), विशेष पथके स्थापन करून त्याद्वारे घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करणे, जनतेचे समुपदेशन आणि प्रबोधन याबाबी सुरुच राहतील. कंटेन्मेंट झोन हद्दीत कठोर नियंत्रण राखणे आवश्यक राहील. वैद्यकीय आणीबाणी तसेच जीवनावश्यक वस्तू व सेवा याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणाने कोणाही व्यक्तीची/लोकसंख्येची या कंटेन्मेंट झोनबाहेर किंवा बाहेरून आत हालचाल/प्रवास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. 


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


रेड, ऑरेंज किंवा ग्रीन अशा कुठल्याही झोनमधील खालील गोष्टींना लॉकडाऊनच्या काळात कायमस्वरूपी बंदी असेल. विमानवाहतूकीला बंदी. तथापि वैद्यकीय सेवा तसेच अपवादात्मक परिस्थितील हवाई ॲम्बुलन्स सेवा आणि इतर आवश्यकता वाटल्यास वैद्यकीय सेवा. ट्रेन वाहतूक पूर्णपणे बंद राहील, तथापि अत्यावश्यक कारणासाठी ट्रेनने प्रवास करण्यासाठी परवानगी. आंतरराज्यीय बसवाहतूक पूर्णपणे बंद, तथापि अत्यावश्यक कारणासाठी  परवानगी. वैयक्तीकरित्या कोणालाही आंतरराज्यीय प्रवास करण्यास बंदी. वैद्यकीय कारणास्तव तसेच अत्यावश्यक लोकांना परवानगी.


शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध क्लासेस यांना बंदी. ऑनलाईन/ इ-लर्निग शिक्षणाला परवानगी. सर्व सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडासंकुल, तरणतलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, बार आणि ऑडिटोरियम, हॉल यांना पूर्णपणे बंदी. सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांना बंदी. धार्मिक कारणासाठी एकत्र येण्यावर बंदी.


सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वैयक्तिक जाण्या-येण्यावर रात्री ७ ते सकाळी ७ पर्यंत पूर्ण बंदी.  सर्व क्षेत्रात ६५ वर्षावरील नागरिकांना आजारी व्यक्तींना, गर्भवती महिला, 10 वर्षाच्या आतील मुले यांना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून फिरण्यावर बंदी, वैद्यकीय कारणास्तव डॉक्टरांकडे जाण्याची मुभा देण्यात आली आहे. 


ऑरेंज झोनमध्ये (कंटेनमेंट झोन बाहेर) आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बस सेवा बंदच राहील. एक वाहनचालक व दोन प्रवाशांसह टॅक्सी व कॅब यांना परवानगी देण्यात येईल. चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालकाशिवाय केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करण्याची मुभा असेल.


ग्रामीण भागातील सर्व उद्योग सुरु राहतील. याबाबतील कामगारांचा निवास व समर्पित वाहनाची अट शिथिल करण्यात आली आहे. तर शहरी भागातील उद्योगांसाठी ही कामगारांच्या निवासाची अट शिथिल केली असून समर्पित वाहनाची अट ऐच्छिक केली आहे. 


शहरी भागातील बांधकामे : केवळ परिस्थितीजन्य बांधकामे (जेथे प्रत्यक्ष जागेवर कामगार उपलब्ध असतील आणि बाहेरून कामगार आणण्याची आवश्यकता नाही) आणि नविनीकरण उर्जा प्रकल्पांच्या बांधकामांना परवानगी आहे. ग्रामीण भागात सर्व बांधकामांना परवानगी आहे.


शहरी भागात सर्व मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स आणि मार्केट बंद राहतील (महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील भाग.) तथापि, बाजारपेठ आणि बाजार संकुलांमध्ये आवश्यक वस्तू विकणाऱ्या दुकानांना परवानगी आहे. शहरी भागातील एकाकी दुकाने, संकुलाजवळील तसेच निवासी संकुलातील दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. आवश्यक आणि अनावश्यक असा कोणताही भेद न करता एका रांगेत/रोडमध्ये (लेनमध्ये) पाच पेक्षा जास्त दुकाने खुली असू नयेत. जर एखाद्या लेनमध्ये/ रोडवर पाचपेक्षा जास्त दुकाने असतील तर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने खुली राहतील. ग्रामीण भागातील मॉल वगळता सर्व दुकाने आवश्यक व अनावश्यक भेद न करता खुले ठेवण्याची परवानगी आहे. सर्व बाबतील सोशल डिस्टसिंग पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे.  
कॉमर्स उपक्रमांना केवळ जीवनावश्यक वस्तू, औषध, वैद्यकीय उपकरणे, सीटीओ आदी विक्री करण्यासंदर्भात परवानगी असेल.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


खासगी कार्यालये ३३ टक्के मनुष्यबळाचा वापर करून सुरू करू शकतील. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये ही उपसचिव व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती ही १०० टक्के तर ३३ टक्के इतर कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. तथापि, संरक्षण आणि सुरक्षा सेवा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पोलीस, कारागृह, गृहरक्षक, नागरी संरक्षण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित सेवा, एनआयसी, सीमा शूल्क, एफसीआय, एनसीसी, एनवायके आणि महानगरपालिका सेवा कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरू राहतील.


मान्सूनपूर्व सर्व कामे, ज्यामध्ये इमारतीचे संरक्षण, शटरिंग, वॉटरप्रूफिंग, पूर संरक्षण, इमारती दुरुस्ती सुरक्षितरीत्या इमारती पाडणे इत्यादी कामांचा समावेश आहे. इतर मान्सूपूर्व कामांना परवानगी दिली आहे.


या मार्गदर्शक सूचनांन्वये ज्या बाबींना विशेषत्वाने करण्यास परवानगी देण्यात आली आहे/काही अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. अशा सर्व बाबीं व्यतिरिक्त इतर सर्व बाबी विविध प्रकारच्या झोनमध्ये करण्यास परवानगी असेल. तथापि, कोवीड १९ चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने परिस्थितीचे अवलोकन करून, ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे, अशांपैकी काही निवडक बाबींस गरज वाटल्यास अटी शर्तीसह परवानगी दिली जाईल.


आंतरराज्य मालवाहतुकीसाठी तसेच रिकाम्या ट्रक्स करिता राज्य आणि जिल्हा प्राधिकारी परवानगी देतील.


पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास कलम 144 नूसार बंदी राहील लग्न सोहळ्यांसाठी सोशल डिस्टसिंग पाळून जास्तीजास्त 50 लोकांना परवानगी दिली आहे. अत्यंसंस्कारासाठी पुर्वीप्रमाणेच 20 लोकांना एकत्रित येण्यास परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी आहेच या पुढे दंड आकारणी होईल. सार्वजनिक ठिकाणी दारु, पान तांबाखुजन्य पदार्थावर बंदी आहे. तसेच पान व तंबाखुजन्य पदार्थावर विक्री करण्यास बंदी असणार आहे. लिकरची दुकाने सुरु राहतील पण केवळ सोशल डिस्टसिंग पाळून विक्री सुरु राहील. या ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोक राहू नयेत अशी अट टाकण्यात आली आहे. या संदर्भात उत्पादन शुल्क विभाग अधिक सूचना असल्यास स्वतंत्रपणे निर्देश प्रसिध्द करतील. परमिट रुम व बार बंदच राहतील. सर्व कामांच्या ठिकाणी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड केले जाईल. अंतर जिल्हा वाहतुक होत असताना बाबींना परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. 


लॉकडाऊन उपाय योजना आणि कोव्हीड १९ व्यवस्थापनाचे निर्देशांचे उल्लघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता (IPC) सेक्शन १८८ आणि इतर कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल. 


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies