विटा-सांगली रोडवरील कार्वे वीज महापारेषण ला लागलेली भयानक आग नियंत्रणात : विटा नगरपरिषद अग्नीशामन दलाने प्राणाची बाजी लावून आग विझवली ;  विटा नगरपरिषदेच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला


विटा-सांगली रोडवरील कार्वे वीज महापारेषण ला लागलेली भयानक आग नियंत्रणात : विटा नगरपरिषद अग्नीशामन दलाने प्राणाची बाजी लावून आग विझवली ;  विटा नगरपरिषदेच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : आज विटा- सांगली रोड लगत कार्वे येथे असलेल्या वीज सब स्टेशनला अचानक भयानक आग लागली होती. या घटनेची माहिती  माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील व मुख्याधिकारी अतुल पाटील यांना या घटनेची माहिती मिळताच तत्काळ यंत्रणा लावत अवघ्या काही क्षणात विटा नगरपरिषदेचे अग्नीशामक दल मिनी टँकरसह घटनास्थळी दाखल झाले. आगीने रौद्ररुप धारण केले असताना ही अग्नीशामक दलातील कर्मचारी शब्बीर मुल्ला, सत्तार शेख, चनबसय्या स्वामी, श्री. पटकुळे, श्री.जानकर श्री.साबळे यांनी प्राणाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवत मोठ्या शर्थीने आग विझवली. व विटा नगरपरिषदेच्या तत्परतेमुळेच मोठा अनर्थ टळला. विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी घटनेचे प्रसंगवधान राखत पालिका यंत्रणा गतीमान केली यामुळे होणारा मोठा अनर्थ टाळता आला. 
विटा नगरपरिषदेच्यावतीने मा. नगराध्यक्ष वैभवदादा पाटील, नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, उपनगराध्यक्ष अजित गायकवाड, मुख्याधिकारी अतुल पाटील यांचेसह सर्वांच्यावतीने अग्नीशामक दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad