कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील एकजण कोरोना बाधित : आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे त्वरित उपचाराखाली ; जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेचे केले कौतुक


कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील एकजण कोरोना बाधित : आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे त्वरित उपचाराखाली ; जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेचे केले कौतुक
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली :  मुंबई येथील ट्रक वर काम करणारा एक जण ट्रकमधुन इस्लामपूर येथे आला. तेथून तो टँकरमधून कवठेमंकाळ तालुक्यातील घोरपडी या आपल्या गावाकडे निघाला होता‌. तथापि मुंबई येथून आल्याने सदर व्यक्तीची वैद्यकीय तपासणी चोरोची येथे करण्यात आली. यावेळी या व्यक्तीची लक्षणे कोरोणा संशयित वाटल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तपासणीसाठी पाठविले. या ठिकाणी असणाऱ्या डॉ. सतीश कोळेकर यांनी त्या व्यक्तीला कवठेमंकाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ.डी.आर. पाटील यांच्याकडे संदर्भित केले. त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेची संपर्क केला असता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेद्वारे सदर व्यक्तीला मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल केले. काल या व्यक्तीचा स्वाब घेण्यात  आला होता. आज त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असून सदर व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे. या व्यक्तीला  त्याच्या गावाकडे जाऊ न देता रस्त्यातच त्याची तपासणी केल्याने पुढील अनर्थ टळला. आरोग्य यंत्रणेने केलेल्या तत्पर हालचालींबद्दल जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad