सांगोला पोलीस स्टेशनला १४१६ आरोपीविरुद्ध कारवाई तर १८२ मोटारसायकली जप्त : पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांची माहिती 


सांगोला पोलीस स्टेशनला १४१६ आरोपीविरुद्ध कारवाई, तर १८२ मोटारसायकली जप्त : पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांची माहिती 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/सचिन धांडोरे : सांगोला पोलीस ठाणे हद्दीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेकरीता जिल्हा दंडाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापुर यानी सोलापुर जिल्हयाच्या हद्दीकरीता संचार बंदी, जिल्हा प्रवेशबंदी वगैरे आदेश पारीत केलेले होते. त्यामध्ये विशेष करुन घराबाहेर विनाकारण पडु नये, मोटर सायकलचा वापर करू नये याबाबत आदेश दिलेले असताना सदर आदेशांचा भंग करणारे, मॉनींग वॉक-इव्हीनींग वॉक, मोटर सायकलवर फिरणारे अशा १४१६ आरोपीविरुद्ध सांगोला पोलीस ठाणेस कारवाई करण्यात आलेली असुन १८० गुन्हे भा.द.वि.क.१८८, २७०, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७(३)/१३५, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सन १८९७ चे कलम २, ३ व४ प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये १८२ मोटर सायकली जप्त केलेल्या आहेत. संचारबंदी व लॉकडाउनच्या काळात बेकायदेशीरपणे जुगार खेळणारे ७६ व्यक्तीविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे १२ गुन्हे दाखल केलेले असुन आरोपींच्या कब्जातुन ८१९९५०/- रुचा जुगार साहीत्य, मोबाईल, मोटर सायकली व रोख रक्कम असा ऐवज जप्त केलेला आहे. संचारबंदीच्या व लॉकडाउनच्या काळात चोरुन बेकायदेशीरपणे दारुची वाहतुक, विक्री, देशी विदेशी दारु तयार करणे, गांजाची वाहतुक-विक्री करणे, गुटख्याचा साठा व विक्री-वाहतुक करणे अशा लोकांची माहिती काढुन त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आलेली आहे. दारु तयार करणारे-विक्री करणारे-बाळगणारे- वाहतुक करणारे अशा १० आरोपिविरुध्द ७५ गुन्हे दाखल केलेले असुन ३९४९ वेगवेगळया देशी विदेशी दारुच्या बाटल्या कि.रु. ३९५३४८/- रु तसेच हातभट्टी दारु व हातभट्टी दारु तयार करण्याचे १०७९९ लीटर रसायन किरु १७५८५०/-रु इतक्या किमतीचे जप्त करण्यात आलेले आहे. अवैध गुटखा वाहतुक करणारे इसमांच्या ताब्यातील २४२९०५/- रु चा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केलेले आहेत तसेच मोटर सायकल व रोख रक्कम जप्त केली असून अन्न व सुरक्षा अधिकारी सोलापुर यानी तक्रार दिलेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अवैध गांजाची वाहतुक करणारे एक महीला व एक पुरुष याना पकडण्यात आलेले असुन त्यांच्या ताब्यातील एक मोटर सायकल, रोख रक्कम व ८ किलो गांजा असा एकुण २२२१५०/- रुा ऐवज जप्त केलेला आहे. संबंधीत आरोपींची वाहने व दारु, गांजा, गुटखा जप्त करण्यात आलेले आहेत. संबंधीतांच्याविरुध्द मा. सत्र न्यायालय पंढरपूर यांच्या न्यायालयात चालणारे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केलेले असुन अटक करण्यात आलेली आहे.
संचार बंदी लॉकडाउनच्या काळात विनाकारण मोटर सायकलीवरुन फिरणारे ज्या वाहन चालकांकडे वाहन चालविण्याचे परवाने नाहीत अशा २५४ वाहन चालकांची वाहने मोटर वाहन अधिनियम कलम २०७ प्रमाणे ताब्यात घेवुन अटकावुन ठेवण्यात आलेली आहेत. त्यामध्ये २५० मोटर सायकली, ३ चार चाकी वाहने व एक रिक्षा अशी वाहने आहेत. जिल्हाबंदी असतानादेखील जे लोक विनापरवाना सोलापुर जिल्हयाच्या हद्दीत येत आहेत. अशा लोकांची माहिती स्थानीक पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व कृती समिती यांच्याकडुन रोजच्या प्राप्त करण्यात येत आहे. सदर इसमांबाबत माहिती घेवुन रोजचे रोज त्यांच्याविरुध्द पोलीस ठाणेस भा.द.वि.क. १८८, २७०, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७(३)/१३५, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सन १८९७ चे कलम २, ३ व ४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. सदरचे इसम कोणत्या वाहनाने आलेले आहेत याची माहिती घेवुन संबंधीत इसम आलेली वाहने गुन्हयात जप्त करण्याची कारवाई मोठया प्रमाणात चालु आहे. त्यामुळे सांगोला पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीण यांच्याकडुन आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही विनापरवाना व बेकायदेशीरपणे सांगली, सातारा, पुणे अथवा कोणत्याही जिल्हयातुन अथवा परराज्यातुन सोलापुर जिल्हयातील सांगोला पोलीस ठाणेच्या हद्दीतील कोणत्याही गावामध्ये प्रवेश करु नये. सध्याचा कालावधी हा अतिशय संवेदनशील कालावधी असुन कोरोना कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव होवु नये याकरीता प्रत्येकानी प्रशासनाकडुन देण्यात येणारे सर्व आदेशांचे काटेकोपणे पालन करावे,जे कायदयाचा भंग करतील त्यांच्याविरुध्द त्वरीत गुन्हे दाखल करण्यात येणार असलेची माहिती पोनि. राजेश गवळी यांनी दिली आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad