टेंभू चे पाणी वरकुटे तलावात दाखल ; लवकरच दिघंचीच्या निंबाळकरवस्ती तलावात येणार पाणी ; सरपंच अमोल मोरे 

टेंभू चे पाणी वरकुटे तलावात दाखल ; लवकरच दिघंचीच्या निंबाळकरवस्ती तलावात येणार पाणी ; सरपंच अमोल मोरे 


टेंभू चे पाणी वरकुटे तलावात दाखल ; लवकरच दिघंचीच्या निंबाळकरवस्ती तलावात येणार पाणी ; सरपंच अमोल मोरे 


माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची : दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली गावाला उन्हाळ्यात पाण्याच्या अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईप योजने झरे येथून पाणी सुरु असून ते पाणी काल रात्री सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वरकुटे तलावात दाखल झाले आहे. 


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम ! तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा !वरकुटे तलाव ते दिघंची येथील निंबाळकर तलाव हे अंतर साधारपणे  १० किमी असून पाणी निंबाळकरवस्ती तलावामध्ये आल्यास दिघंची व परिसरातील असणाऱ्या वाड्यावस्ती वरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. गेल्या वर्षी दिघंचीकराना उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागली होती. त्यातच गेल्या वर्षी निवडणूक असल्याने ज्या-त्या नेत्याच्या समर्थकांनी आपापल्या मर्जीतील लोकांचाच मोफत पाणी वाटप केले होते.


हे ही वाचा:- माळशिरस मध्ये युवकाचा दोरीने गळा आवळून खून


त्यामुळे सर्वसामान्य असणाऱ्या नागरिकांचे फार मोठे हाल झाले होते. दिघंचीचे सरपंच अमोल मोरे यांनी मात्र यासर्व संकटावर मात करत आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या माध्यामातून दिघंचीमध्ये टेंभू योजनेचे पाणी आणून दाखविले होते. त्यामुळे जे विरोधक टेंभू योजनेचे पाणी दिघंचीतील निंबाळकरवस्ती तलावामध्ये येणार नाही असे म्हणत होते ते सुद्धा पाणी पाहून शांत झाले.
परंतु मागील वर्षीचा अनुभव पाहता सरपंच अमोल मोरे व त्यांच्या सर्व सहकारी यांनी पाण्यासाठी पुढाकार घेतला असून काल रात्री टेंभू चे पाणी वरकुटे तलावात दाखल झाले असून पाण्याचा प्रवास दिघंची कडे गतीने सुरू आहे. येत्या काही दिवसात पाणी आपल्या निंबाळकर तलावात दाखल होईल अशी माहिती सरपंच अमोल मोरे यांनी दिली. यावेळी सरपंच अमोल मोरे यांच्यासह मुन्नाभाई तांबोळी, बाळासाहेब होनराव व शेतकऱ्यांनी पाण्याची ठिकठिकाणी पाहणी केली.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments