आटपाडी परिसरातील एसटीपी चोरीला गेल्याने शेतकरी धास्तावले

आटपाडी परिसरातील एसटीपी चोरीला गेल्याने शेतकरी धास्तावले


आटपाडी परिसरातील एसटीपी चोरीला गेल्याने शेतकरी धास्तावले
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी :  आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडी, यपावाडी, नारायणनगर (Khanjodwadi, Yapawadi, Narayanagar) येथील अनेक शेतकऱ्यांचे एसटीपी, चोरीला गेल्याने शेतकरी धास्तावले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(The STP of farmer Anna Deshmukh from Narayanagar was stolen) नारायणनगर येथील शेतकरी आण्णा देशमुख यांचा एसटीपी चोरीला गेला. अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत हे साहित्य लंपास केल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपले एसटीपी फवारणी करण्यासाठी डाळिंब बागेतच ठेवले असल्याने ते लंपास होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.(The disease is currently prevalent in pomegranate orchards)  डाळिंब बागावर सध्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे. त्यातच वातावरण खराब असल्याने औषध फवारणी करावी सातत्याने करावी लागत असते. त्यामुळे बागेतच एसटीपी ठेवले जात असल्याने ते चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तर एसटीपी चोरीला गेल्याने फवारणी कशी करायची या चिंतेत शेतकरी आहेत. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments