दिघंची येथे कोविड सेंटरची उभारणी करा : हणमंतराव देशमुख 

दिघंची येथे कोविड सेंटरची उभारणी करा : हणमंतराव देशमुख 


दिघंची येथे कोविड सेंटरची उभारणी करा : हणमंतराव देशमुख माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. दिघंची गावी कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठे असून तालुक्यात आज पर्यंत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण हे दिघंची मध्ये असल्याने दिघंची गावी कोविड सेंटरची उभारणी करावी व आरोग्य बाबत तातडीने उपाय योजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.सामुहिक संसर्ग सुरु असल्याने तो थांबविणे हे आरोग्य विभागापुढे मोठे आवाहन निर्माण झाले आहे. दिघंचीतील नागरिकांची मोठ्या संख्येने आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे.


 


त्यामुळे दिघंची येथे वाढते रुग्ण पाहता या ठिकाणी कोविड सेंटर सुरु करावे व आरोग्या बाबत तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी हणमंतराव देशमुख यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली असून निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी सांगली, मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली व प्रांताधिकारी विटा यांना पाठविण्यात आल्या आहेत. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments