पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मिडीयावरील प्रसिद्धी घसरली ; लाईकपेक्षा डिसलाईक जास्त


 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मिडीयावरील प्रसिद्धी घसरली ; लाईकपेक्षा डिसलाईक जास्तमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (30 ऑगस्ट) 'मन की बात' रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. परंतु कालच्या एपिसोडची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा सुरु आहेत.


 


कारण 'मन की बात' या कार्यक्रमाला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईकच जास्त मिळत आहे. पीएमओ असो किंवा नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या यू ट्यूब चॅनलवर लाईकची संख्या डिसलाईकपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. या कार्यक्रमात मोदींनी नीट, जेईई किंवा रोजगारी अशा कोणत्याही मुद्द्यांवर भाष्य न केल्याने विद्यार्थ्यांनी आपला रोष डिसलाईकच्या स्वरुपात व्यक्त केला.


  


पीएमओच्या यू ट्यूब अकाऊंटवर 'Prime Minister Narendra Modi's Mann ki Baat with Nation' असं शिर्षक असलेला कार्यक्रम 30 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित झाला होता. हा कार्यक्रम 37 हजार जणांनी लाईक केलं होतं, तर 69 हजार पेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ डिसलाईक केला होता. म्हणजे कार्यक्रम पसंत करणाऱ्यांपेक्षा नापसंत करणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट आहे.याशिवाय नरेंद्र मोदी यांच्या यू ट्यूब चॅनलवरील व्हिडीओला 47 हजार जणांनी लाईक केलं असून डिसलाईची संख्या जवळपास सव्वालाखांपेक्षा जास्त आहे. एक लाख 23 हजार जणांनी व्हिडीओ डिसलाईक केला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured