गुन्हा दाखल झाल्याने राजू शेट्टी आक्रमक

गुन्हा दाखल झाल्याने राजू शेट्टी आक्रमक


गुन्हा दाखल झाल्याने राजू शेट्टी आक्रमक...तर दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करामाणदेश एक्सप्रेस टीमआटपाडी : बारामती येथे दूध दराबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी काढलेल्या मोर्चात गाईंचा छळ केला म्हणून त्यांच्यासह कार्यकर्त्यावर बारामती पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्याने राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.जर मोर्चामध्ये गायीचा छळ केला म्हणून माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करता मग राहुरी येथील शेतकरी रेवणनाथ काळे यांनी दुधाला भाव मिळत नसल्याने आत्महत्या केली या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करीत नाही असे म्हणत महाविकासआघाडी वर “उद्धवा अजब तुझे सरकार” म्हणत जोरदार टीका केली आहे.यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले , महाराष्ट्रातला दूध उत्पादक शेतकरी गेल्या दोन अडीच महिन्यांपासून सातत्याने आंदोलन करतोय. उत्पादन खर्चापेक्षा पंधरा रुपये कमी दरामध्ये तो दुध विकायला लागलेला आहे. यावेळी दुध उत्पादक शेतकऱ्यांची द्या कोणाला आली नाही. अनेक दूध उत्पादकांनी दुधाचा धंदा परवडत नाही म्हणून आत्महत्या केल्या त्या आत्महत्येला जबाबदार म्हणून राज्याच्या दुग्धविकास मंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं पोलिसांना वाटलं नाही. पण परवानगी नसताना मोर्चा काढला म्हणून जर का आमच्या वर गुन्हा दाखल होत असेल तर गुन्हा केलेला आहे. पोलिसांना काय करायचं ते करा व सरकारला जे काय करायचं करावं. अजून सुद्धा नाही आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत दुधाला दर मिळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा आंदोलन करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले .


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments