आटपाडी तालुक्यात कांदा-बटाटा व्यापाऱ्यासह अन्य दोघांचा कोरोनाने मृत्यू


 


आटपाडी तालुक्यात कांदा-बटाटा व्यापाऱ्यासह अन्य दोघांचा कोरोनाने मृत्यू
माणदेश एक्सप्रेस टीमआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना य संसर्गजन्य विषाणूची मोठ्या प्रमाणावर लागण सुरूच आहे. त्याचबरोबर आता मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्याने आता मृत्यूचे प्रमाण ही हळूहळू वाढू लागले आहे.आटपाडी तालुक्यात आज कोरोनाने तिघांचा बळी घेतला आहे. यामध्ये आटपाडी शहर १, भिंगेवाडी १ व दिघंची येथील १ असे तीन मृत्यू आज कोरोनामुळे झाले आहेत. आज मृत्यू झालेल्या मध्ये आटपाडी शहरातील प्रसिद्ध कांदा-बटाटा व्यापाऱ्याचा समावेश असल्याने व्यापारी भयभयीत झाले आहेत.तालुक्यातील भिंगेवाडी येथील पुरुष व दिघंची येथील एका महिलेचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. मोठ्या प्रमाणात वाढत जाणारे रुग्ण व वाढणारे मृत्यूचे प्रमाण यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी नागरिकांना केले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post