शेटफळे-करगणी रस्ता दुरुस्त करा ; राजेश जाधव : अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन


 


शेटफळे-करगणी रस्ता दुरुस्त करा
राजेश जाधव : अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन
माणदेश एक्सप्रेस न्युजआटपाडी/प्रतिनिधी : राज्य मार्ग १५३ रस्त्याचे काम राजपथ कंपनी करत असताना आटपाडी तालुक्यातील शेटफळे-करगणी इतर जिल्हा मार्ग यावरून डंपर वाहतुकीने रस्ता जागोजागी खचला आहे. मोठ-मोठे खड्डे पडले आहेंत त्यामुळे हा रस्ता धोकादायक झालेला आहे. हा रस्ता कंपनीने त्वरित दुरुस्त करून द्यावा यासाठी मनसेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष राजेश जाधव यांच्या नेतृत्वात आटपाडी तहसीलदार सचिन लंगुटे यांना निवेदन देण्यात आले.जर १५ दिवसांच्या आत रस्ता दुरुस्ती झाला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी राजेश जाधव यांनी दिला आहे. त्याचबरोबर राज्य मार्गाच्या रस्ता रुंदीकरणामुळे ज्यांची घरे उद्धवस्त झाली आहेत त्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुका उपाध्यक्ष शरद ढोकळे, युवा नेते पियुष ढगे, महाराष्ट्र सैनिक रोहन यादव, अमर पवार, सुरज जाधव आदी उपस्थित होते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post