...आता कोरोना सोबत जगणे स्विकारले पाहिजे : खासदार हेमंत गोडसे कोरोना पॉझिटिव्ह

...आता कोरोना सोबत जगणे स्विकारले पाहिजे : खासदार हेमंत गोडसे कोरोना पॉझिटिव्ह


 


...आता कोरोना सोबत जगणे स्विकारले पाहिजे : खासदार हेमंत गोडसे कोरोना पॉझिटिव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युजनाशिक : कोरोना या संसर्गजनी रोगाचे थैमान सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्याची लागण मोठ्या संख्येने कलाकार, राजकारणी, सामाजित कार्यकर्ते यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे.नाशिक खासदार हेमंत गोडसे यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. “माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी व सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकिय सल्ल्याने गरज असल्यास स्वतःची कोरोना चाचणी करावी.


  


मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरू ठेवेन, व कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन” असे ट्वीट त्यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी आता कोरोना सोबत जगणे स्वीकारले पाहिजे म्हणत नागरिकांना सामाजिक संदेश देखील दिला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments