ग्रामीण जगृकता कार्यानुभव कार्यक्रम माध्यमातून माती परीक्षण


ग्रामीण जगृकता कार्यानुभव कार्यक्रम माध्यमातून माती परीक्षणअकलूज/प्रतिनिधी : अकलूज येथील रत्नाई कृषि महाविद्यालयात चैथ्या वर्षामध्ये शिकत असलेली कु. रणनवरे नम्रता बाळासाहेब हीने ग्रामीण जगृकता कार्यानुभव कार्यक्रम च्या माध्यमातून माणकी ता. माळशिरस येथे शेतकऱ्यांना माती परीक्षण विषयी मार्गर्शन केले.माती परीक्षण करताना शेतीतील माती कधी व कशी गोळा करावी याचे मार्गर्शन केले. यावेळी शेतामध्ये शेतकऱ्यांसमोर माती काढून ती कशी मिसळून घ्यावी हे दाखवले. मातीतील घटकांचे वर्गीकरण केले.
त्यामुळे पिकावर काय परिणाम होतात. उत्पादन कसे वाढते हे सर्व घटक तिने शेतकऱ्यांना समजावून सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानची माहिती झाली.कोरोनामुळे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम आपल्या-आपल्या गावामध्ये राबवण्यात आला आहे .  यावेळी माणकी  येथील वैभाव भोसले,  काशिनाथ भोसले,  संकेत रणनवरे, रामचंद्र रणनवरे, सौरभ रणनवरे इ. शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रम समन्वयक डॉ. डी. पी. कोराटकर, प्राचार्य आर.जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस. अर. अडत कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. मेटकरी यांचे मार्गद्शन लाभले आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post