राज ठाकरेंचा सरकारला इशारा

राज ठाकरेंचा सरकारला इशारा


 


तर सरकारचे आदेश झुगारुन मंदिर प्रवेश करु, राज ठाकरेंचा सरकारला इशारा


 


 


मुंबई : सरकारने नियमावली आखून मंदिर खुली केली नाहीत तर आदेश झुगारुन मंदिर प्रवेश करु असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे.  सरकारला मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.


 


 


दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असताना नेमकं महाराष्ट्रातच मंदिर का बंद ठेवली जात आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे. 


 


 


मंदिर हा भक्ती पुरता विषय नाही यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मॉल, सार्वजनिक कार्यक्रम यासाठी जसे निर्बंध आहेत तसे मंदिराबाबत ही असू द्या. सरकारने लवकर सकारात्मक पाऊल उचलले नाही तर सरकारच्या आदेशाना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी, एमआयएम नंतर मनसे ही राज्यातील मंदिरे उघडण्याच्या आंदोलनात उतरली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments