प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक स्वरूपाची ऑक्सिजन थेरपी चालू करा : मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी

प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक स्वरूपाची ऑक्सिजन थेरपी चालू करा : मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी


प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक स्वरूपाची ऑक्सिजन थेरपी चालू करा :  मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी


माणदेश एक्सप्रेस न्युज


 


सांगली : कोविड-19 चे जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील वाढते प्रसारण लक्षात घेता बहुतांश रूग्णांचे प्राथमिक स्थिरीकरण करणे आणि त्यायोगे ऑक्सिजनसह लवकर परफ्यूजन करणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागातील रूग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर अथवा डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलला दाखल होईपर्यंतचा काळ अत्यंत महत्वाचा असून त्यामध्ये रूग्णाचा जास्त वेळ जाऊ नये यासाठी अशा रूग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक स्वरूपाची ऑक्सिजन थेरपी चालू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.


 


मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ताप, सर्दी, खोकला, दम / धाप लागणे, अंग दुखी, घसा दुखणे / खवखव अशी लक्षणे असलेल्या संशयिंत रूग्णांना गरजेनुसार औषधे द्यावीत. जर औषधे देवून लक्षणे कमी होत नसतील तर त्यांची रॅपीड ॲन्टीजन चाचणी करण्यात यावी व पुढील कार्यवाही करण्यात यावी. या व्यतिरिक्त इतर अगोदरच पॉझिटीव्ह आलेले रूग्ण ज्यांचे SpO2 90 टक्के पेक्षा कमी आहे, ज्यांना इतर गंभीर आजार नाहीत अथवा नियंत्रित स्वरूपात आहेत, अशा रूग्णांना गरजेनुसार 5 ते 10 लिटर प्रति मिनिट फेस मास्कव्दारे ऑक्सिजन देण्यात यावा. ऑक्सिजन चालू केल्यानंतर पहिले दोन तास, दर अर्ध्या तासाने SpO2 तपासावे. त्यामध्ये वाढ होत नसल्यास अशा रूग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर / डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल मध्ये संदर्भ सेवा द्यावी. संदर्भ सेवा देताना रूग्णाच्या स्थितीबाबत पाहणी करून याबाबत विस्तारपूर्वक रेफरल लेटर देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहनाने संदर्भित करावे.


 


ज्या रूग्णांचे SpO2 वाढत आहे अशा रूग्णांना वॉर्डमध्येच ठेवून ऑक्सिजन देत रहावे तसेच दाखल झालेल्या रूग्णांना Inj. Methly Prednisolone (1mg/ kg of Body wt) विभागुन देण्यात यावे. सदर इंजेक्शन पहिल्यादिवशी डोसेस IV स्वरुपात देण्यात यावे, त्यानंतर IM स्वरुपात दिल्यासा चालु शकेल. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असलेल्या कॅन्टिनच्या इमारतीस प्रथम प्राधान्य, ज्या ठिकाणी पुरुष वार्ड उपलबध आहे त्या वार्डास द्वितीय प्राधान्य आणि सदर देान्ही जागा उपलबध नसल्यास आहे त्या वार्डमधील 4 बेड्स ऑक्सिजेनेटेड बेड्स म्हणुन तयार करावेत. प्रत्येक 2 बेडला 1 सिलेंडर जोडावा. प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीमधील जागा वापरल्यास या वॉर्डमध्ये ये-जा करण्याची सोय वेगवेगळी असावी. जर तशी सोय नसेल तर कोविड व नॉन कोविड क्षेत्र दर्शविण्यासाठी पार्टीशनची सोय करावी. 


 


जिल्हास्तरावरुन ऑक्सिजन सिलेंडरची सोय तसेच त्याचे पुर्नभरण (O2 Cylinder Refiling) लागणाऱ्या औषधांचा व साधनांचा (N-95 Mask, Face Shields, Surgical Glovers, Surgical Caps, Medicines) पुरवठा जिल्हास्तरावरुन होणार असून जिल्हा आरोग्य अधिकारी हे स्वत: या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी राहतील. त्याचप्रमाणे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी हे प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर नोडल अधिकारी म्हणुन कार्यभार सांभाळतील. प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करण्यासाठी व पुर्नभरणासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यासाठी एका वाहनाची सोय करावी. 


 


या कक्षामध्ये कामकाज करण्यासाठी मुख्यालय अथवा कार्यक्षेत्रातील खाजगी एम.बी.बी.एस अथवा बी.ए.एम.एस डॉक्टर, खाजगी नर्सेस यांच्याशी संपर्क साधुन एक सामाजिक जबाबदारी म्हणुन स्वयंसेवकाप्रमाणे पाचारण करावे. या कामामध्ये कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधुन सदर एैच्छिक मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. प्राथमिक आरोग्य केंद्र कवठेपिरान (ता. मिरज) येथे राबविण्यात आलेल्या मॉडेलप्रमाणे कार्यवाही करावी गरजेप्रमाणे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कवठेपिराप यांच्याशी संपर्क करावा.


 


 तथापि, प्राथमिक आरोग्य केंद्र नॉन कोविड कामकाजावर परिणाम होणार नाही याची पुर्ण काळजी वैद्यकीय अधिकारी यांनी घ्यावयाची असून पुर्वीप्रमाणेच फिवर क्लिनिक व इतर कोविड संबंधी कामकाजामध्ये खंड पडणार नाही यांची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या आहेत.


 Post a comment

0 Comments