सांगली  जिल्ह्यातील मृत्यू दर रोखण्यात जयंत पाटील अपयशी : आम. गोपीचंद पडळकर 

सांगली  जिल्ह्यातील मृत्यू दर रोखण्यात जयंत पाटील अपयशी : आम. गोपीचंद पडळकर 


 


सांगली  जिल्ह्यातील मृत्यू दर रोखण्यात जयंत पाटील अपयशी : आम. गोपीचंद पडळकर मुंबई  : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसोंदिवस वाढत आहे. या पार्शवभूमीवर सांगली जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू दर असल्याचे आढळळून आले आहे, त्यामुळे भाजप आमदार  गोपीचंद पडळकर यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  ‘सांगली जिल्हा हा जयंत पाटलांची जहागिरी आहे काय? लोकप्रतिनिधींना आढावा बैठकीसाठी बोलवण्याचे त्यांच्यात धाडस नाही. असे पुन्हा केल्यास जिल्ह्यात फिरणे मुश्किल होऊन जाईल. दुसरीकडे जिल्ह्यात ऑक्सिजन बेड्सची कमतरता आहे. आवश्यक तेवढे व्हेंटिलेटर नाहीत.पालकमंत्र्यांनी मात्र जिल्ह्यातील या स्थितीकडे दुर्लक्ष केले. जिल्ह्यातील रुग्णालयांना आवश्यक सुविधा पुरवण्यातही ते अपयशी ठरले. असे आमदार गोपीचंद  पडळकर म्हणले आहेत.तसेच “पालकमंत्री जिल्ह्याला निधी मिळवून देऊ शकले नाहीत हा त्यांचा नाकर्तेपणा आहे. या अपयशाची जबाबदारी घेऊन जयंत पाटलांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा’, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एखदा भाजप व राष्ट्रवादी असा रंगणार आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments