कोरोनाबाबत आवश्यक उपाययोजना करा ; वकील संघटनेचे आपत्ती व्यवस्थापन समितीला निवेदन
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर : कोरोनाबाबत आवश्यक उपाययोजना योजना तात्काळ होणेबाबत आटपाडी तालुका वकील संघटनेने आपत्ती व्यवस्थापन समितीला निवेदन दिले असून विविध मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.
यामध्ये आटपाडी तालुक्यासह शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरानाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तसेच दिवसें दिवस कोरोना पेशंटची संख्या जास्तच वाढू लागली आहे. कोणतेही लॉकडाऊन चालू नसलेने व व्यापार, व्यवसाय व बाजार इत्यादी चालू आहे . त्यामुळे लोकांची गर्दी वाढत आहे.
तसेच काही लोक विनाकारण घराबाहेर पडत असून बरेचसे लोक मास्कचा वापर करताना दिसून येत नसल्यानेच कोरोनाची संख्या झपाटयाने वाढत असलेचे दिसून येते. आटपाडी पोलीसांचेकडून ठराविक वेळेतच व ठराविक ठिकाणीच तपासणी मोहीम राबविली जाते. परंतू काही लोक पोलीस दिसताच मास्क घालत असून बाकी ठिकाणी मास्कचा वापर करताना दिसून येत नाहीत.
मास्कचा वापर न केल्याने कोरोनाचा प्रचार व प्रसार जोमाने होताना दिसून येत आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती चालू राहीली तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणेचे उद्देशाने सर्व उपाय योजना तात्काळ करणेत यावेत. तसेच वकील संघटनेचे सदस्यही या कोरोनाचे संकटात येत असलेने आटपाडी येथील सर्व वकील सदस्यांना ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणेसाठी आवश्यक ते साहीत्य तसेच औषधे देणेत यावीत अशीही मागणी करण्यात आली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
0 Comments