घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर

घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर


घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दरमाणदेश एक्सप्रेस न्युज
मुबंई : १ सप्टेंबर २०२० रोजी मेट्रो शहरांमध्ये लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) ची किंमत सलग चौथ्या महिन्यात स्थिर आहे. एलपीजी सिलिंडर्स सप्टेंबर महिन्यात ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून मागील महिन्याप्रमाणेच किंमतीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एलपीजी सिलिंडरच्या किंमती देशात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बदलल्या जातात. जाणून घ्या, घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर नेमके किती असतील.


 इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार मेट्रो शहरांमध्ये विनाअनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत एक सप्टेंबर २०२० पासून दिल्लीत ५९४ रुपये, कोलकातामध्ये ६२०.५० रुपये, मुंबईत ५९४ रुपये आणि चेन्नईमध्ये ६१० रुपये अशी असणार आहे.


 दरम्यान, यापूर्वी ऑगस्टमध्ये विना अनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत ५९४ रुपये, कोलकातामध्ये ६२१ रुपये, मुंबईत ५९४ रुपये आणि चेन्नईमध्ये ६१०.५० रुपये होती. जून आणि जुलैमध्ये या चार महानगरांमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत तितकीच होती.


 मे आणि जूनमध्ये एलपीजी सिलिंडर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खात्यात सरकारकडून कोणतेही अनुदान जमा केले गेले नाही. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने यामागील कारण सांगितले की, मे २०२० पासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी झाल्यामुळे त्यांच्या किंमतीत सब्सिडीचा काही भाग नाही. म्हणूनच मे, २०२० आणि जून २०२० या महिन्यात पुरवठा करण्यात आलेल्या एलपीजी सिलिंडरसाठी कोणतेही अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले नाही.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments