औरंगाबाद मध्ये एमआयएम व शिवसेना आमने-सामने, मंदिर सुरु करण्यावरून तणाव : हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही ; खासदार इम्तियाज जलील यांचा चंद्रकांत खैरे यांना इशारा

औरंगाबाद मध्ये एमआयएम व शिवसेना आमने-सामने, मंदिर सुरु करण्यावरून तणाव : हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही ; खासदार इम्तियाज जलील यांचा चंद्रकांत खैरे यांना इशारा


 


औरंगाबाद मध्ये एमआयएम व शिवसेना आमने-सामने


मंदिर सुरु करण्यावरून तणाव : हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही ; खासदार इम्तियाज जलील यांचा चंद्रकांत खैरे यांना इशारा


 


औरंगाबाद : हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही. हिंदू मंदिरे आणि धर्माला कुणीही आपली मक्तेदारी समजू नये असा टोला एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लगावला आहे.


 


“हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही. हिंदू मंदिरे आणि धर्माला कुणीही आपली मक्तेदारी समजू नये. ज्यांना धर्माच्या नावाने राजकारण करायचं आहे ते लोक असा वाद घालतात. मी जनतेचा खासदार आहे जनतेचे प्रश्न सोडवणार. मी मंदिरात गेलो तरी मंदिराचे पूर्ण पावित्र्य राखणार. तिथे माझ्या सोबत हिंदू बांधवही असणार आहेत”, असं इम्तियाज जलील यांनी सांगितले.


 


तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जलील यांच्यां मंदिर उघडण्याच्या मोहिमेवर टीका केली होती. खैरे म्हणाले, “मी इथेच उभा आहे. मंदिर कसं उघडतं ते पाहू. आम्ही मंदिर उघडण्यासाठी समर्थ आहोत.”


 


एमआयएमने मंदिरं उघडण्यासाठी सुरु केलेल्या मोहिमेतंर्गत पुजाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. औरंगाबादमधील प्रसिद्ध खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांची एमआयएम भेट घेणार आहे. निवेदन देऊन मंदिर उघडण्याची विनंती करणार आहे. तर मशिदी उघडण्याची एमआयएमची मोहीम सुरु होणार आहे.


 


“राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू”, असे अल्टिमेटम एमआयएम नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला दिले होते.


 


यावेळी बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले,  “मी इथेच उभा आहे. मंदिर कसं उघडतं ते पाहू. आम्ही मंदिर उघडण्यासाठी समर्थ आहोत. मी अभिषेकही केला आहे. पण मंदिर उघडे करा हे इम्तियाज जलील कोण बोलणारे? हे सर्व राजकारण आहे. त्यांना राजकारण करायचं आहे. शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडली असं त्यांना दाखवायचं आहे. त्यांचा शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव आहे. ते आम्ही सहन करणार नाही, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. त्यामुळे काही काळ वातारणात तापले होते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments