पुण्यात सराईत गुन्हेगाराचा खून : सहाजणांना अटक 

पुण्यात सराईत गुन्हेगाराचा खून : सहाजणांना अटक 


 


पुण्यात सराईत गुन्हेगाराचा खून : सहाजणांना अटक 


 


पुणे :  खराडी येथे सहा जणांच्या टोळक्यावने सोमवारी पहाटे एका सराईत गुन्हेगारास दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आला. हा खुन पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे चंदननगर पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शैलेश घाडगे (वय 33) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील नैवैद्यम हॉटेलशेजारी मोकळे मैदान आहे. या मैदानावर सोमवारी सकाळी एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.एका तरुणाला दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्याकडे आढळलेल्या ओळखपत्रावरून तो मृतदेह शैलेश घाडगे यांचा असल्याचे पोलिसांना समजले. घाडगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून हा खून झाला सराईत गुन्हेगार शैलेश घाडगे याचा असल्याचे त्यावेळी कुख्यात गुंड शैलेश घाडगे याचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शैलेश सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 


 


कोरोनाच्या पाश्वभूमीवर कारागृहातून अनेक जणांना जामिनावर सोडण्यात आले होते. त्यामध्ये घाडगे हा देखील कारागृहाबाहेर आला होता. काही दिवसांपूर्वीच त्याचे एकाशी भांडण झाले होते. या भांडणाच्या रागातूनच त्याचा खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments