आटपाडी पोलिसांच्या अन्यायी,अत्याचारा विरोधात दिघंची येथील माजी सैनिक रमेश ईश्वर मोरे व शहाजी रंगनाथ मोरे  यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु

आटपाडी पोलिसांच्या अन्यायी,अत्याचारा विरोधात दिघंची येथील माजी सैनिक रमेश ईश्वर मोरे व शहाजी रंगनाथ मोरे  यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु


 


आटपाडीत पोलिसांच्या अन्यायी,अत्याचारी विरोधात दिघंची येथील माजी सैनिक रमेश ईश्वर मोरे व शहाजी रंगनाथ मोरे  यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु
माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भोते व त्याच्या सोबत असलेल्या पोलिसांनी व गावगुंड यांनी पोलीस बळाचा वापर करून स्वमालकीच्या पत्रा शेडचे व सिमेंट दुकानाचे नुकसान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात दिघंची ता.आटपाडी, जि.सांगली येथील माजी सैनिक रमेश ईश्वर मोरे व शहाजी रंगनाथ मोरे यांनी आंदोलन सुरु केले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दिघंची गावामध्ये माजी सैनिक रमेश ईश्वर मोरे व शहाजी रंगनाथ मोरे यांची वडिलोपार्जित गट नं. १६३१ मध्ये स्वमालकीचे घर व पंढरपूर कराड मार्गावर घराला लागून ११ गुंठे खुली जागा आहे. सध्या या जागेची किंमत करोडो रुपये असलेने उत्तम जाधव आवळाई यांनी आटपाडी येथील गावगुंड आणून दमदाटी केली त्यावेळी आटपाडी पोलीस ठाणे येथे तक्रार देणेस गेलो असता त्यावेळी तक्रार घेतली नाही. उलट पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यांतर दोन दिवसांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भोते व त्यांच्या सोबत असलेले पोलीस व इतर गावगुंड यांनी आमच्या घरी अचानक जेसीबी घेवून आले व २० ते २५ गुंड यांनी आमचे पत्र्याचे शेड काढून घ्या नाहीतर सदर जागा जाधव यांना देवून टाका अशी धमकी दिली.याबबत आम्ही जाधव यांना त्यांची जागा शाशकीय मोजणी आणून घ्यावी असे आम्ही सांगतिले असता भोते यांनी सर्वासमोर आम्हास धमकी देवून हातवारे करून पत्रा शेड काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक भोते व त्यांच्या सोबत असलेले पोलीस यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सैनिक रमेश ईश्वर मोरे व शहाजी रंगनाथ मोरे यांनी केली असून याबाबत आटपाडी पोलीस ठाणे येथे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.या आंदोलनात रोहित देशमुख, महादेव मोरे, बबन औंधकर, कुंडलिक मोरे, अभिमन्यू मोरे, प्रदीप चव्हाण, दिनक मोरे, हणमंत मोरे, नितीन मोरे बाबासो रंगनाथ मोरे, विकास दादासो मोरे, सदाशिव मोरे, सुभाष मोरे, औदुंबर मोरे, भारत मोरे यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments