मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण


 


मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण मुंबई : कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यातल्या सुमारे १५ ते १६ मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली त्यात आता दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश झाला आहे.


 


नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून करोनाची चाचणी करून घ्यावी.


 


आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी बरा होईन आणि पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होईन असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लक्षणं नाहीत. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिलीप वळसे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच सरकारने कोरोनासंदर्भात घालून दिलेले नियम पाळा असंही आवाहन केलं आहे.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments