मनकर्णवाडी येथे दोन घरांना आग ; संसारपयोगी वस्तू जळून खाक ; कोणतीही जीवितहानी नाही

मनकर्णवाडी येथे दोन घरांना आग ; संसारपयोगी वस्तू जळून खाक ; कोणतीही जीवितहानी नाही


 


मनकर्णवाडी येथे दोन घरांना आग ; संसारपयोगी वस्तू जळून खाक ; कोणतीही जीवितहानी नाही


 म्हसवड/अहमद मुल्ला : मनकर्णवाडी ता. माण येथे दोन घरांना लागलेल्या आगीमध्ये संसारपयोगी साहित्य जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले मात्र कसलीही जीवित हानी झाली नाही.बुधवारी मध्यरात्री १ वा. 30 च्या सुमारास मनकर्णवाडी ता. माण येथील सुभाष तानाजी जगदाळे व रुकमाबाई तानाजी जगदाळे यांच्या घराला अचानक आग लागली. लागलेली आग विझविण्यासाठी म्हसवड नगरपालिकेचा अग्निशामक व कर्मचारी तातडीने मनकर्णवाडीस जाऊन दोन्ही घराची आग विझवली.


 यावेळी दोन्ही घरात असणारे गॅस सिलेंडर नगरपालिका कर्मचारी सागर सरतापे यांनी घरामध्ये स्वत: जाऊन गॅस सिलेंडर घरातून बाहेर काढले व तेथील घरामध्ये राहत असलेले नागरिक सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे कसलीही जीवित हानी झाली नाही. परंतु संसारपयोगी साहित्य जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.यावेळी म्हसवड नगरपरिषदेचे अग्निशमन दलाचे सागर सरतापे, गणेश चव्हाण, दीपसागर सरतापे, शरद वाघमारे, प्रवीण पिसे, राजेश चव्हाण, समीर सरतापे , राजेंद्र सरतापे हे कर्मचारी उपस्थित होते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


 


Post a comment

0 Comments