“रोहित पवार यांनी समाजकारण केले नसून धंदा केलाय”! : मंत्री राम शिंदे 

“रोहित पवार यांनी समाजकारण केले नसून धंदा केलाय”! : मंत्री राम शिंदे 


 


“रोहित पवार यांनी समाजकारण केले नसून धंदा केलाय”! : मंत्री राम शिंदे मुंबई - रोहित पवार यांनी समाजकारण केले नसून धंदा केलाय, असा घणाघाती टोला शिंदेंनी लगावला. भाजपा नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या गंभीर आरोप केले आहेत. मी केलेल्या कामांचं भूमीपूजन मंत्र्यांचे हस्ते झाले असतानाही, ते पुन्हा एकदा त्याच कामांचे भूमीपूजन करत आहेत. कोंबड्याची पिल्ल, मासे, आणि बियाणं इथं विकून ते धंदा करत आहेत, समाजकारण नाही, असा आरोप शिंदे यांनी केलाय. 


 


आमदार रोहित पवार यांच्या आमदारकीच्या कार्यकाळास आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. रोहित यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन गेल्या एक वर्षात आपण काय-काय कामे केली याचा लेखाजोखा मांडला आहे. मात्र, भाजपा नेते राम शिंदेंनी रोहित पवार यांच्यावर घणाघाती टीका केलीय. रोहित पवार यांनी कोंबड्यांची पिल्ल, मासे आणि बियाणं विकून समाजकारण नाही तर धंदा केलाय. मासे, कोंबड्याची पिल्लं आणि बियाणं इथं आणून ते विकतात. त्यामुळे, समाजकारण नाही तर धंदा करण्यासाठीच ते इथं आलेत, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे ते बोलत होते. रोहित पवारांनी तुकाई उपसा सिंचन योजनेसह अनेक कामं बंद पाडली आहेत. बारामती पॅटर्न सपशेल फोल ठरला असून लोकांची घोर निराशा झालीय, नव पर्व... वगैरे काहीही नसून सगळं खोट असल्याचंही शिंदे यांनी म्हटले. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


 


Post a comment

0 Comments