संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार : राजेश टोपे

संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार : राजेश टोपे


 


संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार : राजेश टोपे


 


अहमदनगर : राज्यात हळूहळू कोरोना संपुष्टात आल्याचे चित्र दिसून येत आहे. म्हणून कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम आता हळूहळू शिथिल केले जात आहेत. अनलॉकच्या टप्प्यांतर्गत विविध गोष्टी सुरू केल्या जात आहेत. सरकारने हॉटेल, रेस्टोरेंट सुरू करण्यास देखील परवानगी दिली आहे. मात्र असे असले तरी लोकल सेवा, मंदिरे उघडण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही.


 


आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात आता लॉकडाऊनचा विषय राहिलेला नाही. येत्या नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.


 


कोरोनावर अद्याप प्रतिबंधक लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्व काही अनलॉक केलं जाणार आहे. पुढील काही दिवसात राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, असे राजेश टोपे म्हणाले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments