तडवळेतील जाधव कुटुंबीयांचे प्रविण दरेकर यांनी केले सांत्वन : दरेकरांना अश्रू अनावर 

तडवळेतील जाधव कुटुंबीयांचे प्रविण दरेकर यांनी केले सांत्वन : दरेकरांना अश्रू अनावर 


 


तडवळेतील जाधव कुटुंबीयांचे प्रविण दरेकर यांनी केले सांत्वन : दरेकरांना अश्रू अनावर आटपाडी : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आटपाडी तालुका दौऱ्यात तडवळे गावाला भेट दिली. या गावातील  शुभम जाधव हा २२ वर्षाचा तरुण अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यात बुडाला होता .त्यामुळे जाधव यांच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या घरी दरेकर यांनी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. अतिवृष्टीमुळे त्यांचे कुटुंबच उध्वस्त झाले आहे, पण अद्यापही कुठलीही शासकीय मदत त्यांना मिळालेली नाही.दरम्यान शुभमच्या आईने आपली व्यथा दरेकर यांच्याकडे मांडली. यावेळी त्यांच्या व्यथा एकून दरेकर यांनाही अश्रू अनावर झाले. संवेदनशील विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी जाधव कुटुंबियांना धीर दिला. त्यांचा प्रश्न सरकारी दरबारी मांडण्यात येईल. अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या जाधव  कुटुंबाला न्याय मिळवून देऊ, असे वचन दरेकर यांनी यावेळी दिले. तसेच हा विषय अतिशय संवेदनशील असून याप्रकरणी आपण जिल्हाधिका-यांशी बोलू व त्यांना लवकर मदत मिळवून देऊ. “ताई आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही काळजी करु नका” या शब्दांत दरेकर यांनी त्यांना धीर दिला.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments