Type Here to Get Search Results !

कोरोनाची राज्यातील आकडेवारी दिलासादायक , मृत्यूदरात घट 

 



कोरोनाची राज्यातील आकडेवारी दिलासादायक , मृत्यूदरात घट 


 


मुंबई : कोरोनाचा कहर कधी संपुष्टात येईल याची वाट सर्वच जण पाहत आहेत. गेल्या काही दिवसातील कोरोनाची आकडेवारी पाहून चिंता वाढत आहे. मात्र गेल्या पाच दिवसातील कोरोनाची राज्यातील आकडेवारी दिलासादायक आहे. गेल्या पाच दिवसात राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत घट पाहायला मिळाली आहे. आज राज्यात 10 हजार 244 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांतील ही सर्वात कमी आकडेवारी आहे. त्यामुळे कोरोनाच चढता आलेख गेल्या पाच दिवसात खाली उतरु लागलाय, ही दिलासादायक बाब आहे.


 


गेल्या काही दिवसांतील कोरोनाची आकडेवारी



5 ऑक्टोबर : राज्यात आज 10 हजार 244 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर नवीन 12 हजार 982 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1162585 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 252277 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80 टक्के झाले आहे.



4 ऑक्टोबर :राज्यात 4 ऑक्टोबर रोजी 13 हजार 702 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर 15 हजार 048 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते.



3 ऑक्टोबर : राज्यात 3 ऑक्टोबर रोजी 14 हजार 348 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर 16 हजार 835 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते.



2 ऑक्टोबर : राज्यात 2 ऑक्टोबर रोजी 15 हजार 591 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर 13 हजार 294 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते.



1 ऑक्टोबर : राज्यात 1 ऑक्टोबर रोजी 16 हजार 476 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर 16 हजार 104 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते.



30 सप्टेंबर : राज्यात 30 सप्टेंबर रोजी 18 हजार 317 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर 19 हजार 163 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते.



महाराष्ट्रात 6 महिन्यांपासून बंद असलेले 4 लाख रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी कोविड संबंधी नियमावलीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. 4 लाख बार आणि रेस्टॉरंटपैकी एकट्या मुंबईतील संख्या 14,000 एवढी आहे, त्यापैकी सुमारे 30-40% नी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, इतरांनी आठवडाभर थांबून प्रतीक्षा करण्याचे ठरवले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे रविवारी म्हणाले की, कोविड-19 रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा झाली आहे आणि उपचाराविषयीचे प्रोटोकॉल बदलल्यामुळे मृत्यूदरात घट झाली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies