इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्याच्या तारखेत मुदतवाढ

इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्याच्या तारखेत मुदतवाढ


 


इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्याच्या तारखेत मुदतवाढनवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचं आयकर विभागाने जाहीर करण्यात आलं आहे. देशात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने आयटीआर भरण्याच्या तारखेत मुदतवाढ केली असून करदात्यांना दिलासा दिला आहे.  आयकर विभागाने ट्वीट करुन या संदर्भात माहिती दिली आहे.याआधी सरकारने मे महिन्यात वित्त वर्ष २०१९-२० साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवली होती. या तारखेत ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढ करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा रिट्र्न भरण्याची तारीख वाढवली असून आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत रिटर्न भरता येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक व्यापारी, प्रोफेशनल्स वेतनधारी आणि अन्य करदात्यांना याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments