“राज्यपाल हे सुज्ञ आहेत, ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत,” : संजय राऊत

“राज्यपाल हे सुज्ञ आहेत, ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत,” : संजय राऊत


 


“राज्यपाल हे सुज्ञ आहेत, ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत,” : संजय राऊत
मुंबई – . “राज्यपाल हे सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. ते किती प्रेम आहे हे देशाला माहिती आहे आणि या प्रेमातून यापुढे सर्व कारभार सुरळीत होईल. आम्ही राज्यपालांचा नेहमी आदर करतो. राज्यपाल घटनाबाह्य काम करणार नाहीत. ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत,” अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
ठाकरे सरकार हे घटनात्मक सरकार आहे. राज्यपाल हे या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपालांचं जे मत आहे, त्या मताचा आदर आम्ही नेहमी करतो. शेवटी कॅबिनेटचा निर्णयाचे पालन राज्यपालांना करावा लागतो.” “राज्य सरकारने जी यादी पाठवली आहे, ती घटनेच्या आधारे पाठवली आहे. राज्य सरकारने कधीही घटनाबाह्य काम केले नाही आणि करणारही नाही. राज्य सरकारने ती यादी सर्व पक्षांचे एकमत झाल्यानंतर पाठवली आहे, त्यात काय सांगायचं आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments