आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई : आणिबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.


 रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी पोलिसांनी अटक करुन अलिबागला नेले आहे. इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. या अटकेबाबत फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a Comment

0 Comments