अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर ठाकरे सरकारवर भडकली कंगना 

अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर ठाकरे सरकारवर भडकली कंगना 


 


 


अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर ठाकरे सरकारवर भडकली कंगना मुंबई : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई येथील राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून आक्षेपार्ह उल्लेख केले आहेत.


 


कंगनाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? अशी विचारणा कंगनाने ठाकरे सरकारला केली आहे. तिने म्हटलं आहे की, “मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वांमी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात?”.


 


कंगनाने यावेळी पुन्हा एकदा सोनियासेना उल्लेख करत, “सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? ही तोंडं वाढतच जाणार आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील,” असं म्हटलं आहे. “पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो. पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना…वडिलांच्या पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना..सोनियासेना म्हटल्यावर राग येतो का…तुम्ही आहात सोनियासेना,” असंही कंगनाने म्हटलं आहे.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


 


 


Post a comment

0 Comments