Type Here to Get Search Results !

“आम्ही काय मेलेल्या आईचे दूध प्यायलोय का”? : प्रविण दरेकर

 



पुणे : मुंबईत भाजपाचा भगवा फडकवणार असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं, त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुमच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवणं सोडा, हातही लावता येणार नाही असा टोला लगावला होता, त्यावर भाजपा नेत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे.









भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांची पूर्णपणे आत्मविश्वास हरवलेली बॉडी लँग्वेज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. भगवा काही पेटंट दिला का? आम्ही काय मेलेल्या आईचे दूध प्यायलोय का? जनता ठरवणार भगवा कोणाच्या हातात द्यायचा. छत्रपतींचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा फक्त शिवसेनेचा नाही असा घणाघात त्यांनी शिवसेनेवर केला.





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies