Type Here to Get Search Results !

कोरोना पोहोचला बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरापर्यंत

 



मुंबई :  गेल्या एक-दोन महिन्यांपासून बॉलिवूड कलाकारांची कामं पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. सर्वांनी चित्रपट, मालिका, टेलिव्हिजन कार्यक्रमांचं शूटिंग सुरू केलं आहे. कोरोना लॉकडाऊन काळात थांबलेली कामं पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. मात्र असे असले तरीही कोरोनाची भीती अद्यापही कायम आहे. या कलाकारांचा दिवसभरात विविध लोकांशी संपर्क येत असल्याने ही भीती आहे.




कोरोना आता बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरापर्यंत पोहोचला आहे. घरातील स्टाफमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सलमान खान आता होम क्वारंटाइन असणार आहे. सलनाच्या ड्रायव्हरसह 2 जणं कोरोना संक्रमित आढळून आले आहेत.





 सलमान आणि त्याचे कुटुंबीय आता आयसोलेट झाल्यामुळे अभिनेत्याचे आई-वडील सलीम खान आणि सलमा खान यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम देखील होणार नाही आहे. संक्रमित स्टाफ मेंबर्सना मुंबईतील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. मात्र अद्याप खान कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट समोर आले नाही आहे.

 




Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies