"विद्वान' आमच्यावर जेवढी टीका करतील, तेवढी आमची मते वाढतात : उदय सामंत

"विद्वान' आमच्यावर जेवढी टीका करतील, तेवढी आमची मते वाढतात : उदय सामंत


 


"विद्वान' आमच्यावर जेवढी टीका करतील, तेवढी आमची मते वाढतात : उदय सामंतसातारा  : कोल्हापूरसह राज्यातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. अनेकांनी निवडणुकीच्या काळात गद्दारी केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना तोडीस तोड उत्तर देऊन धडा शिकवावा. सातारा जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांनी असे काम करावे की त्याची दखल इतर पक्षांनी घ्यावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून माझी निवड झाली. त्याची प्रचिती अवघ्या तीन महिन्यांत कामातून दिसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


 "पूर्वी सिंधुदुर्गात काही जणांची दादागिरी होती. आता तेथे शिवसेना मजबूत झाली आहे. त्यामुळे कोणाचीही दादागिरी तेथे चालत नाही. ते "विद्वान' आमच्यावर जेवढी टीका करतील, तेवढी आमची मते वाढतात. त्यामुळे त्यांनी टीका करावी, आमचा फायदा होईल,' अशा शब्दांत भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर नाव न घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी टीका केली. 


 कर्नाटक सीमा प्रश्नानवरून ठोस भूमिका न घेणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सामंत यांनी टीका केली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सवदी हे चंद्र, सूर्य असेपर्यंत बेळगाव आमचेच राहणार म्हणतात, पण त्यावर पाटील काही बोलत नाहीत. कर्नाटक प्रश्ना्वर भाजपची कोणतीच भूमिका नाही, असा टोला त्यांनी लगावला. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments