Type Here to Get Search Results !

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा आमदार हवा कि राजकीय पक्षाची बांधिलकी मानणारा याचा निर्णय पदवीधरांना घ्यायचा आहे : डॉ.निलकंठ खंदारे ; पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.निलकंठ खंदारे यांच्या भूमिकेस मिळतेय पदवीधरांचे मोठे पाठबळ





 पदवीधरांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा आमदार हवा कि राजकीय पक्षाची बांधिलकी मानणारा याचा निर्णय पदवीधरांना घ्यायचा आहे : डॉ.निलकंठ खंदारे ; पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.निलकंठ खंदारे यांच्या भूमिकेस मिळतेय पदवीधरांचे मोठे पाठबळ   


माणदेश एक्सप्रेस न्युज





आटपाडी : पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे.विधानसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे सामान्य अर्धशिक्षित,अशिक्षित जनता राजकीय नेते,पक्ष यांच्या खोट्या आश्वासनाला,निवडणुक सभांमधील भाषणांना बळी पडते तसेच पदवीधर मतदार संघातील डॉक्टर,वकील,शिक्षक,अगदी पदवीधर होऊनही कुठल्यातरी खाजगी आस्थापनांमध्ये कामगार कायद्याचा,राज्य विमा योजनेचा,कामगार कल्याण मंडळाच्या योजनेचा कुठलाही लाभ मिळत नसलेला पदवीधर कामगार,सुशिक्षित बेरोजगार,स्वयंरोजगार करणारा तरुण विधानसभा निवडणुकी प्रमाणे बळी पडेल असाच ठाम विश्वास वाटत असल्यामुळे हे राजकीय पक्ष नेते आज प्रचार दौरे काढत आहेत मतदार नसलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पदवीधर मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत.पण हीच वेळ आहे पदवीधर मतदारांनी आता सावध झाले पाहिजे अशीच भूमिका पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.निलकंठ खंदारे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेताना मांडली आहे.          





पुणे विभाग पदवीधर मतदार संघात ज्यांच्याकडून मतदान करण्यात येणार आहे त्या मतदारांच्या अपेक्षा,अडचणी आणि त्यांना भेडसावणारे प्रश्न केवळ राजकीय पक्षाची भूमिका हीच पदवीधरमधील पक्षीय उमेदवारांची भूमिका बनली असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे आणि यामुळेच विधानपरिषदेची मतदान करणारा पदवीधर मतदार यावेळी कधी नव्हे इतका जागृत झालेला दिसून येत आहे. 





कुठल्या राजकीय नेत्याची,पक्षाची भूमिका सांगू नका तुम्ही आज आम्हाला मते मागत आहात तुमचे आमच्यासाठीचे आतापर्यंतचे कार्य काय,संपर्क कधी केला होता का आणि आमच्या प्रश्नासाठी कधी पाठपुरावा केला होता का ? असा सवालही हा जागृत झालेला पदवीधर मतदार करीत असून मी गेल्या अनेक वर्षांपासून पदवीधरांच्या, विनाअनुदानित शिक्षकांच्या तसेच पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केलेला असो अथवा नसो कुठलीही समस्या घेऊन आलेला व्यक्ती अथवा संस्था,संघटना असो त्यांनी मांडलेल्या समस्यांचा अभ्यासपूर्व पाठपुरावा डॉ.निलकंठ खंदारे करत आलेले आहेत त्यामुळे या मतदार संघातून त्यांना पदवीधर मतदारांचा मोठा पाठींबा मिळत असून ते विजयी होतील असा आत्मविश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies