४ खासदार निवडून येणाऱ्या पक्षाचा लोकनेता... आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा शरद पवार यांच्यावर टिका

४ खासदार निवडून येणाऱ्या पक्षाचा लोकनेता... आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा शरद पवार यांच्यावर टिका४ खासदार निवडून येणाऱ्या पक्षाचा लोकनेता... आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा शरद पवार यांच्यावर टिका 


सांगली : सांगली येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी ४ खासदार निवडून येणाऱ्या पक्षाचा लोकनेता... म्हणत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ज्या पक्षाचे ४ खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल ही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केला आहे. तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा कशासाठी असे म्हणत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. 

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पदवीधरची निवडणूक ही भ्रष्टाचाराविरोधातील आणि प्रखर जातीयवाद्यांच्या विरोधातील आहे. या टग्यांच्या सरकारच्या विरोधातील ही निवडणूक आहे, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केल्याने पुन्हा एकदा आमदार पडळकर व राष्ट्रवादी असा संघर्ष पहावयास मिळणार आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments