Type Here to Get Search Results !

धनगर आरक्षणप्रश्नी न्यायालयीन लढयाबरोबरच, रस्त्यावरची लढाई जोमाने लढू : आमदार गोपीचंद पडळकर ; न्यायालयीन लढाईसाठी दिली १० लाख रुपयांची मदत



धनगर आरक्षणप्रश्नी न्यायालयीन लढयाबरोबरच, रस्त्यावरची लढाई जोमाने लढू : आमदार गोपीचंद पडळकर ; न्यायालयीन लढाईसाठी दिली १० लाख रुपयांची मदत 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी :  धनगर आरक्षणप्रश्नी न्यायालयीन लढयाच्या कार्यकर्ते म्हणून पाठीशी आहेच, परंतु रस्त्यावरची लढाई सुद्धा जोमाने लढू. त्याचबरोबर धनगर आरक्षण प्रश्नी न्यायालयीन लढाईसाठी त्यांनी १० लाख रुपयांची मदत आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधन मंचचे मधु शिंदे यांच्याकडे सुपूर्त केली यावेळी ते बोलत होते. 





झरे ता. आटपाडी जि.सांगली येथे धनगर आरक्षण प्रश्नाबाबत मधु शिंदे यांच्या शिष्टमंडळाने आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेतली. यावेळी सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. अशोक शेजाळ, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री. कोळपे, सोपान काळे, टी.एस.काळे आदी प्रमुख उपस्थित होते.




 


यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, धनगर एस टी आरक्षण न्यायालयीन लढ्याच्या सद्यस्थिती बाबत न्यायालयीन लढ्याचे प्रमुख मधु शिंदे यांच्याशी चर्चा झाली. लढ्यासाठी आर्थिक तरतूदीची गरज आहे असा मुद्दा समोर आल्याने मी माझी जबाबदारी म्हणून न्यायालयीन लढ्यासाठी १० लाख रुपये मदत केली आहे. इथून पुढे आरक्षणासाठी जे जे करावे लागेल ते ते करु. न्यायालयीन लढ्याच्या पाठीशी समाजातील एक कार्यकर्ता म्हणून ठाम पणे उभे राहूच परंतु रस्त्यावरची लढाई सुद्धा जोमाने लढू. त्यामुळे आमदार पडळकरांनी धनगर आरक्षण प्रश्नी न्यायालयीन लढाईसाठी १० लाख रुपयांच्या मदतीमुळे धनगर आरक्षणाला बळ मिळणार आहे.





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies